कौसडी–बोरी रस्त्यावर नागठाणा पाटीजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन एक जण गंभीर जखमी तर तिघे जखमी झाल्याची घटना आज शनिवार १३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता घडली. अपघाताची माहिती मिळताच पत्रकार शेख नईमोद्दीन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोरी आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्स घटनास्थळी बोलावून घेतले. नागरिकांच्या मदतीने जखमींना ॲम्बुलन्समध्ये बसवून बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने तिघांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.