दर्यापूर येथील नवीन तहसील कार्यालय जवळ असलेल्या एका झेरॉक्स दुकानाला आज मध्यरात्री २:३० वा.च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली.या घटनेत झेरॉक्स दुकानातील ३ लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आज सकाळी १० वा.सूत्रांकडून प्राप्त झाली.याबाबत दर्यापूर पोलीसात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.अमरावती दर्यापूर रोडवरील नवीन तहसील समोर अपंग असलेले श्रीकृष्ण सरोदे व त्यांची पत्नी रा.साईनगर यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी झेरॉक्स दुकान सुरू केले होते