लातूर -लातूर-जहीराबाद महामार्गावरील लांबोटा पाटी येथे हॉटेल राजवाडा जवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कार व मोटारसायकलची समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील दोघेजण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातातील गंभीर जखमेला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी आज दुपारी तीन वाजता बोलताना दिले आहे.