आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची देगलुर आगाराची एसटी बस क्रमांक एमएच २० बिएल ११५२ या वझर ते देगलुर एसटी बसच्या चालकाचा गाडीवरील तोल सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या (दरीत) खड्यात कोसळली आहे. यामध्ये एकुण २८ प्रवाशी जखमी झाले आहेत तर जखमींपैकी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये चालक आणि वाहकाचा सुद्धा समावेश आहे गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड व इतर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.