मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घ्यावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महागाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने १ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर–तुळजापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी शैलेश कोपरकर, उदय नरवाडे, संजय नरवाडे आदींसह मराठा बांधवांनी महागाव पोलीस स्टेशनला आज दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान निवेदन दिले.