आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान शहरातील गोवर्धन घाट स्मशान भुमीच्या जवळ एक इसम गावठी पिस्टल बाळगुन असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानीय गुन्हे शाखेने व वजीराबाद पोलिसांनी गोवर्धन घाट येथे जाऊन इसम श्रीहरी ऊर्फ हरीश देविदास शर्मा वय 25 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. गोवर्धन घाट,वजिराबाद यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूस मिळून आले. वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये आरोपी हरीश शर्मा विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल