पारवेकरनगर माहुर येथे फिर्यादीचे घरी दि २५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे तीनच्या सुमारास यातील आरोपी विजय सुर्यवंशी याने फिर्यादीस शिवीगाळ करून तु माझ्या सोबतचे संबंध का तोडलीस तुला आता सोडणार नाही असे म्हणून घरात घुसून तिच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली आणि डाव्या हाताचे मध्यमा बोट तोडले.याप्रकरणी फिर्यादी सुशीलाबाई राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी माहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.