लातूर-मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभरात असंतोष उफाळला असताना, अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक येथील 35 वर्षीय बळीराम मुळे या तरुणाने विष प्राशन करून आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या तरुणावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तो सध्या मृत्यूची झुंजा देत असल्याचे डॉक्टरांनी आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता बोलताना सांगितले.