कृष्णा नदीच्या पाण्यात तब्बल १० फूट घट झाल्याने,गेल्या सहा दिवसांपासून पाण्याखाली असलेले पवित्र श्री नृसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर आता दर्शनासाठी खुले होण्याच्या तयारीत आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली असून, भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे.आज सोमवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.नदीचे पाणी मंदिरातून मागे हटू लागल्यामुळे,उत्सव मूर्ती जेथून हलवण्यात आले होते.