कंटेनर अडवून चालकाला कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परप्रांतीय कंटेनर चालक रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हा चेहडी भागातून कंटेनर घेऊन जात असताना दोन महिलांसह पाच जणांनी रिक्षेतून येऊन कंटेनर चालकाला रस्त्यात अडवले त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील पाच हजारांची रोकड तसेच मालकाचा क्यूआर कोड घेऊन आणखी पैशाची मागणी केली.