माधुरी हत्तीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्वपूर्ण निर्णय देत हाय पॅावर कमिटीला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे नांदणी मठाला माधुरी हत्ती मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे.नांदणी मठाकडून सोमवारी हाय पॅावर कमिटीकडे माधुरी हत्ती मागणीसाठी औपचारिक अर्ज सादर करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज शुक्रवार, दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता सांगितले.