मारेगाव तालुक्यातील नरसाळा गावात किरकोळ वादातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गावातील एका 30 वर्षीय युवकाला आरोपीने विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. पीडित युवकाने पोलीस स्टेशन मारेगाव येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.