जिंतूर तालुक्यातील सोनापुर तांडयावर कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नीवरच पतीने सात ते आठ वार करून तिचा निर्घृण खून केला. हि घटना गुरुवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. मृत महिलेचे नाव विद्या विजय राठोड वय ३२ वर्ष असे असून ती मूळची सोनापुर तांडा येथील रहिवासी आहे. या प्रकरणी मयताचे वडील दिगंबर प्रताप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुरुवार 28 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता विजय राठोड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.