पालम तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून बनवस गाव परिसरात असलेल्या खादक नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे, या पुरामुळे नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेला असून पूलपार करण्यासाठी जात असलेला युवक पाण्याच्या प्रवाहत वाहून गेल्याची घटना आज गुरुवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 30 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी मोठ्या हिमतीने नदीच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या युवकाला नदीतून बाहेर काढून युवकाचे प्राण वाचवले. या युवकाचे नाव भागवत कदम वय 30 वर्ष राहणार बनवस आहे.