महागाव तालुक्यातील मोरथ ते धारमोहा या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने या रस्त्यांची अवस्था तलावा सारखी झाली आहे. या रस्त्यावरुन दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते, या रस्त्यावरुन विद्यार्थ्यांना, महिलांना, शेतकऱ्यांना वाहनधारकांना, रुग्णांना येजा करावी लागते, मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्तीची झाली नाही.