काझीपुरा परिसरात शुक्रवारी ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम समुदायाने मिरवणूक काढली. सकाळपासूनच संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण दिसून आले. तसेच गरजुंना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.मिरवणुकीत लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. मुले हातात आकर्षक झेंडे घेऊन पुढे चालत होती. रंगीबेरंगी झेंड्यांनी सजवलेल्या मार्गावरील मुलांचा गट मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होता. काझीपुराचा संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग सजावटीच्या झेंड्यांनी सजवण्यात आला होता. पारंपारिक घोषणा व झेंड्यांच्या रांगा फडकवत होते.