महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर केल्याने ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करून ओबीसी समाज संघटना दिग्रसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. यासंदर्भात ओबीसी समाज संघ दिग्रसच्या वतीने आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी ओबीसी समाज संघटनेचे कार्यकर्ते यादव गावंडे यांनी प्रतिक्रिया दिली.