पूर्णा तालुक्यात काल ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेती पिकांचे, घरांचे व जनावरांना बाबतीत झालेल्या सर्व नुकसानींचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्याशी शनिवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास दिल्ली येथून भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहाणी करा आणि सर्वांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, असे आदेश दिले आहेत.