टाकरखेडा या गावाजवळ तापी नदीत शेळगाव बॅरेज आहे. येथील बॅरेजच्या गेट क्रमांक १४ जवळ पाण्यात तरंगताना एका अनोळखी सुमारे २५ ते ३० वर्षीय वयोगटातील तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला व यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.