जिंतूर शहरासह तालुक्यातील पाचलेगाव शिवारात बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.या वादळी वाऱ्यामुळे पाचलेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सध्या काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या हळद पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.