जिंतूर तालुक्यातील मौजे सायखेडा गावात लहान मुलांच्या वादावरून तीस वर्षी महिला शमा साळवे यांना जबर मारहाण करण्यात आली, या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असुन त्यांच्यावर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. आठ दिवस उलटूनही अद्यापही मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली नाही. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी शमा साळवे यांनी आज शनिवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता शासकीय रुग्णालय येथे केली आहे.