जिंतूर शहरातील साठे नगर परिसरात इलाही तैय्यब कुरेशी यांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना 24 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली या मारहाणीत इलाही तैय्यब कुरेशी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर परभणीतील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. इलाही कुरेशी यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा अशी मागणी तैय्यब कुरेशी व कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे आज शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता केली आहे.