देगलुर शहरात सन २०२१ ते दि ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान यातील आरोपी पंढरी नाईक रा. बावलगाव जिल्हा बिदर याने यातील फिर्यादीस पेट्रोल पंप, बिअर बार, म्हाडाची घरे, व शासनाचे इतर लाभ मिळवून देतो म्हणून वेळोवेळी फिर्यादी कडून ऑनलाईन माध्यमातून व रोख स्वरूपात असे ४७ लाख ९० हजार ८७६ रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी संजय खरात व्यवसाय शेती रा. बावलगाव जिल्हा बिदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी देगलुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.