न्हावी या गावात विठ्ठल मंदिर कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये श्रीराम फुटवेअर नावाचे दुकान आहे. या दुकानासमोर गणपतीचा फोटो काढण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून तिनेश वारके वय ३० याला हेमंत बोरोले, भावेश इंगळे, सुहास इंगळे, सचिन वाघुळदे,रिकेन वाघुळदे,हितेश इंगळे, चेतन झोपे व देवेंद्र नेहेते यांनी मारहाण केली. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.