एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक या गावात बस स्थानका जवळ एरंडोल ते जळगाव जाणाऱ्या रोडवर दुचाकी क्रमांक एम.एच.१९ ई.आर. ६७०४ द्वारे प्रवीण पाटील व त्यांच्या मागे प्रियरंजनदास गुरु आचार्य महान साहेब वय ३५ हे जात होते. दरम्यान दुचाकीला ट्रक क्रमांक एम.एच.१८ बी.ए. ०१८८ वरील चालक वकील अहमद शकील अहमद यांनी धडक दिली. यात प्रियरंजनदास हे ठार झाले. तेव्हा या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.