दि.1 सप्टेंबर रोजी रात्री 7:55 च्या सुमारास नवीन मुजामपेठ जाणाऱ्या रोडवर आरोपी शेख ताहेर शेख अजगर व रमेश लक्ष्मण जमरा हे दोघेजण पिस्टलचे जिवंत काडतूस विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले असता त्यांना नांदेड ग्रामीणचे पोनि चिंचोलकर व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत गुन्हा नोंद केले आहेत, अशी माहिती आजरोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने प्रेस नोटद्वारे देण्यात आली आहे.