शहरातील गांधी चौक, चंद्रपूर येथे आज दि.2 सप्टेंबर ला दुपारी 1 वाजता सकल ओबीसी समाजातर्फे भव्य निदर्शन आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून आरक्षण देण्याच्या प्रयत्नांचा उपस्थितांनी तीव्र निषेध नोंदवला.या निदर्शनात ओबीसी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून घोषणाबाजी करत आरक्षणाचे संरक्षण करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.