तुमसर तालुक्यातील मिटेवानी ते हिंगणा रस्त्यावर दि. 6 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 12 वा.च्या सुमारास महसूल पथकाचे मंडळ अधिकारी साठेकर यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आपल्या भरारी पथकासह पेट्रोलिंग दरम्यान विनापरवाना मुरुमाचे चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेत सदर दोन्ही ट्रॅक्टर जप्त केला. याप्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक गुड्डू वाघाडे व सुनील नेवारे तसेच ट्रॅक्टर मालक बुधराज पटले यांच्याविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.