राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पडवळवाडी इथ कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केलीय. शैलेश जाधव आणि वासुदेव मुंडे अशी अटक केलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोटी 77 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आज पत्रकारांशी बोलताना देण्यात आली आहे.