इचलकरंजी शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 26 तास चालली.शनिवारी सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रविवारी, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता "पोलीस बॉईज" मंडळाच्या मूर्ती विसर्जनाने संपन्न झाली.डॉल्बीच्या कडकडाटात शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप दिला.परंतु,यंदा डॉल्बीमुळे पारंपरिक वाद्यसंगीत बाजूला पडल्याचे चित्र दिसून आले.ढोल-ताशांच्या पारंपरिक गजराऐवजी प्रचंड आवाजात वाजणाऱ्या डॉल्बीच्या स्ट्रक्चर्सनी रस्ता अडवला होता.