महाराष्ट्रात भाजप सरकारला सत्तेवर येऊन दहा महिने होत आले तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य प्रश्नांवर कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. अतिवृष्टी, कीड, सोलर योजनेतील अडथळे, वन्य प्राण्यांमुळे नुकसान अशा विविध समस्यांमुळे शेतकरी अडचणीत आहेत.सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये 'आक्रोश मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे.