परळी शहर हादरवून टाकणारी एक अत्यंत भीषण आणि संतापजनक घटना घडली होती. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने समाजमन अस्वस्थ झाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तात्काळ पोलीस यंत्रणेला सतर्क केले. त्यामुळे अवघ्या पाच तासांच्या आतच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पंढरपूर येथील एक कुटुंब आपल्या मुलाबाळांसह परळी येथे आले होते. शेख सजन शेख अल्लाभक्ष असे आरोपीचे नाव आहे.