राणीसावरगांव येथे मंगळवार 19 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत मारोती वाघमारे यांनी आमच्या गल्लीमध्ये पाणी का येत नाही? असा प्रश्न उपस्थित करून ग्रामविकास अधिकाऱ्याकडे जाब विचारला. प्रश्न का विचारला असे म्हणत सरपंच पतीने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक करावी अशी प्रतिक्रिया गुरु रविदास समता परिषद प्रदेशाध्यक्ष शिवाजी हणमंतराव लखवाले यांनी बी रघुनाथ सभागृहात आज रविवार 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 30 वाजता दिली आहे.