औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद ते बेरूळा रस्त्यावर बेरूळा येथील चौकात रस्त्याच्या मध्यभागी अज्ञात लोकांनी लावलेला भगवा झेंडा दिनांक ८ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबी च्या साह्याने हटविण्यात आला दरम्यान गावात झेंडा प्रकरणावरून तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यावरून अभियंता कोकडवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात लोकांवर सायंकाळी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला