यंदा नवरात्रोत्सव तब्बल अकरा दिवसांचा आल्यामुळे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची विक्रमी गर्दी अपेक्षित आहे. या गर्दीच्या नियोजनासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तयारी सुरू केली असून, गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.