अर्जुनवाडा व करड्याळ या शेजारील गावांमध्ये चिकोत्रा नदीपात्रात दरवर्षी गौरी विसर्जनाच्या दिवशी साजरी होणारी अनोखी परंपरा 'नाल उत्सव' यावर्षी मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मोठ्या उत्साहात पार पडली असल्याची माहितीशेखरपाटील यांनी आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दिली.गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे डबक्यात पाणी उडवत ही परंपरा जपली गेली होती.मात्र,यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला.