तथागतनगर नांदेड येथे दि १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास यातील आरोपी १) शकीला २) वसिम ३) शेख अजम ४) फय्याज अहमद यांनी संगणमत करून यातील फिर्यादी सोबत रिलेशन मध्ये राहणारी २१ वर्षीय महिलेस जबरदस्ती कारमध्ये नेऊन निला नगर आदिलाबाद येथे पळवून नेवून अन्यायाने कैदेत ठेवले. याप्रकरणी फिर्यादी शेख सलमान शेख रशिद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिसात आज रोजी सायंकाळी गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केजगिर आज करीत आहेत.