सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जमिनीवर सरपटणारे साप आढळून येतात.अशातच बाळापूर तालुक्यातील व्याळा पेठ येथील रहिवासी श्याम गोमाशे यांच्या राहत्या घरी शनिवार दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास विषारी कोब्रा जातीचा नाग लपून बसला होता.त्यामुळे घरातील महिलांसह व्यक्तींची तारांबळ उडाली.व घरात भीतीचे वातावरण पसरले होते.त्याचं वेळी गावातील सर्प मित्र कुलदीप दामोदर यांना बोलाविले व त्यांनी कोब्रा जातीच्या विषारी नागाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले तेव्हा घरच्यांनी सुटकेचा श्वास टाकला.