बीड जिल्ह्यात खून आणि गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच एका धक्कादायक घटनेत पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळाचा निघृण खून करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ही घटना रायामोह पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या दगडवाडी शिवारात घडली. मृताचे नाव दीपक केरा भिल्ला (रा. बहानपूर, मध्यप्रदेश) असे असून तो व्यवसायाने मेंढपाळ होता.