लातूर :-लातूर ते मुरूड या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कराड- लातूर ही एसटी बस घसरून पलटी झाली. ज्यात जवळपास पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मुरुड अकोला ते रामेगाव दरम्यान दिनांक 4 जून रोजी रात्री 8: 30 च्या सुमारास घडली असून 15 प्रवासी जखमी झाले असून जखमीला लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक पाच जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान गातेगाव पोलिसांनी बोलताना दिली आहे.