राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून,अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.अशा परिस्थितीत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेले वादग्रस्त विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले आहे.एका पत्रकार परिषदेत बोलताना पाशा पटेल म्हणाले, “शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय करून घेतली पाहिजे.ही त्यांच्या कर्माची फळं आहेत.” त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.