तालुक्यातील वरुड जऊळका पुंडा कालवाडी परिसराला गत दोन ते तीन दिवसांपासून दररोज ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढत असल्याने परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिसरातील नदी नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणावरती पूर आलाय पुराचे पाणी शेतामध्ये शिरून पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी या नुकसानाचे तात्काळ शासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे