विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चक्क शिव मंदिरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. तर वर्दळ असणाऱ्या चौकातील कॉर्नरच्या पान टपरीचा दरवाजा उचकटून आतील वीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी फिरोज अब्दुल पखाली ( वय ३६ रा. गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रामबाग परिसरात गेल्या दोन दिवसांपासून घरफोडीसह चोरी होत आहे. सोमवारी २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री तीन चोरटे एका दुचाकीवरून स्फूर्ती चौकात