ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत कुंडलिका पुलाशेजारी असलेल्या हॉटेल रोहा प्राईड येथे नाकाबंदीकरिता नेमण्यात आलेल्या पोलिसांनी मध्यरात्री एका संशयस्पद पीकअप टेम्पोचालकाला चौकशीकरिता थांबण्यास सांगितले. मात्र, पीकअप टेम्पो चालकाने गाडी न थांबविता पसार झाला. त्यानंतर सुरु झालेल्या थरारनाट्यात पोलिसांनी पाठलागकरुन चालकाची धरपकड केली. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख 65 हजार रुपये किंमतीचा टेम्पोभर मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.