आज दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे फार्मसीस्ट डे आयोजन करण्यात आले होते. मोर्शी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून, रुग्णालयातील औषधाचा तुटवडा पाहून सलाईन व औषधे रुग्णालयात देण्यात आले. यावेळी अल्पपहाराचे आयोजन देखील करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला