गेली सात दिवस मनोभावे विराजमान केलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने शहरातील ५२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार,गणेश भक्तांना विसर्जनासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येणार असून,प्रत्येक ठिकाणी मनपाच्या वतीने कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.गणेशोत्सवाचा समारोप करताना पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्ती विसर्जन व्हावे असे आवाहन केले आहे.