आज बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी रिपब्लिकन सेनेचे अमनभैय्या आंबेडकर यांनी मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेतली या भेटिनंतर अमनभैय्या आंबेडकर यांनी आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, रावनगाव येथे पुरामुळे नुकसान झालेल्या पुनर्वसीतांना स्थीर घरे व तत्काळ मदत द्या अन्यथा मोठा मोर्चा काढु असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अमनभैय्या आंबेडकर यांनी आज दुपारी रावनगाव येथे शासनाला दिला आहे.