तलासरी तालुक्यातील वडवली नवापाडा येथे असलेल्या सेटवाला फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या मांसाहारी खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपनीत चिकन पासून निरनिराळे पदार्थ तयार केले जातात. कंपनीत दरोरोज पोल्ट्री फार्म मधून येणाऱ्या हजारो कोंबड्यांची स्वयंचलित यंत्रावर कत्तल करुन खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे आजूबाजूच्या गावात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अनेकांना त्वचेचे विकार होत आहेत.