धारूर तालुक्यातील भोगलवाडी फाटा येथे मोठा गोंधळ उडाला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या बॅनरची अज्ञात व्यक्तींनी फाडून विटंबना केली. या प्रकारामुळे ओबीसी समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेत तात्काळ घटनास्थळी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक मोठ्या संख्येने जमले होते आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली.