वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे.समायोजनासह विविध मागण्यांकरिता कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 640 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वर्धेच्या जिल्हापरिषद समोर बैल पोळ्यानिमित्त लक्षवेदक आंदोलन केले यावेळी बैलजोडी आणून आंदोलनात बैलजोडीचे पूजन करत सरकार विरोधात झडत्या म्हणतं निषेध नोंदविला.